आषाढी यात्रा : l श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई;

विठ्ठल टाईम्स प्रतिनिधी:-

पंढरपूर :आषाढी यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास तसेच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसराचे रूप अधिकच देखणे, दिमाखदार व भक्तिमय झाले आहे.

आषाढी यात्रेनिमित्त राज्यासह देशभरातून लाखो वारकरी व भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होत आहेत. दिवस-रात्र अखंड सुरू असलेल्या दर्शन व्यवस्थेबरोबरच मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत सजावट भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. सूर्यास्तानंतर संपूर्ण परिसर विविधरंगी प्रकाशाने उजळून निघत आहे.

सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाचे काम प्रगतिपथावर असून, या कामामुळे मंदिराला त्याचे मूळ स्थापत्य वैभव पुन्हा प्राप्त होत आहे. प्राचीन वास्तुशैलीचे सौंदर्य अधिक ठळकपणे समोर येत असतानाच त्यावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई मंदिराच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभवात अधिक भर घालत आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यावरील कळसावर करण्यात आलेली सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. कळसदर्शनासाठी येणारे अनेक वारकरी व भाविक या अलौकिक दृश्याचे छायाचित्रण करून या अविस्मरणीय क्षणांची आठवण जतन करत आहेत.

विद्युत रोषणाईसाठी अत्याधुनिक एलईडी माळा, रोप लाईट, आकर्षक लटकन, सजावटीची तोरणे, व्हाईट व वॉर्म फोकस लाईट्स तसेच विविध डेकोरेटिव्ह लाईट आर्टिकल्सचा वापर करण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण विद्युत यंत्रणा अत्याधुनिक सुरक्षा मानकांनुसार उभारण्यात आली असून, आवश्यक संरक्षक यंत्रणा व तांत्रिक उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत २४ तास देखरेख ठेवण्यात येत आहे. सदरची आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरे समितीमार्फत करण्यात आली असून, संपूर्ण नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी विद्युत विभाग प्रमुख राजेश तेलतुंबडे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.