कार्तिकी यात्रेत मंदिर समितीस ४ कोटी ७७ लाख रुपये दान

* गतवर्षीपेक्षा १ कोटी.५६ लाख रुपयांची वाढ. * सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांची माहिती.

कार्तिकी यात्रेत मंदिर समितीस ४ कोटी ७७  लाख रुपये दान

पंढरपूर ( प्रतिनिधी) : पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा सोहळा संपन्न झाला असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस एकूण ४ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

आजपासून प्रक्षाळपूजा झाल्यानंतर नित्योपचार सुरू होणार आहेत. कार्तिकी प्रबोधिनी एकादशी 

. .गुरूवार, दिनांक २३ नोव्हेंबर, रोजी होती. या दिवशी.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ.अमृता फडणवीस तसेच मानाचे वारकरी .बबन विठोबा घुगे व सौ.वत्सला बबन घुगे यांच्या शुभहस्ते श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. या यात्रेचा कालावधी दि. १४ते दि.२७ नोव्हेंबर असा होता.

यावर्षी तुलनेने भाविकांची गर्दी कमी असली तरी उत्पन्नात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.राज्यातील गोरगरीब जनतेचा देव श्रीमंत होत आहे.

या यात्रेत मंदिर समितीस विविध माध्यमांतून रू.४ कोटी ,७७ लाख ८ हजार,२६८/- इतकी देणगी प्राप्त झाली आहे. त्यामध्ये श्रींच्या चरणावर रू.४० लाख ,१५ हजार, ६६७/-, रोख देणगी स्वरूपात रू.१ कोटी ,३० लाख ,५ हजार,४८६/-,  

लाडू प्रसाद विक्रीतून रू.६२ लाख ४९ हजार/-, नवीन भक्तनिवासातून रू.६६ लाख ६२ हजार ३७७/-, सोने-चांदी भेट वस्तूमधून रू.८ लाख ,३६ हजार २५४/-, परिवार देवता व हुंडीपेटीतून रू.१ कोटी ५७ लाख २१ हजार ५२७/-, मोबाईल लॉकर व इतर जमेमधून रू.१०, लाख ९४ हजार,८०७ रू.

 इत्यादीचा समावेश आहे. गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेपेक्षा रू.१ कोटी ,५६ लाख ,४८ हजार ५२६/- इतकी उत्पन्नात वाढ झाली आहे.

याशिवाय, सुमारे ३ लाख ४० हजार ४७८एवढ्या भाविकांनी श्रींचे पदस्पर्श दर्शन व ५ लाख ७२हजार २२० एवढ्या भाविकांनी श्रींचे मुखदर्शन घेतले असल्याची माहिती सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.