जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी बाबर यांची नियुक्ती

जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी बाबर यांची नियुक्ती

 पंढरपूर /प्रतिनिधी :-

 राज्याचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजी बाबर यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी निवड झाली केली आहे.

 शिवसेनेचे सचिव आणि सोलापूर व पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते संजय मशीलकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही निवड करण्यात आली आहे.

   शिवाजी बाबर हे पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील रहिवासी आहेत. 1993 पासून शिवसेनेच्या कार्यकर्ता आणि शाखाप्रमुख पदापासून पक्षात काम केले आहे. सध्या तालुका प्रमुख पदावर आहेत , त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने ही निवड होताच,शनिवारी झालेल्या बैठकीला उपस्थित राहून प्रश्न मांडण्यासाठी संधी मिळाली आहे.

 सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विस्वासू शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर,यांचेसह जिल्ह्यातील पाच शिलेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

   मुख्यमंत्री नियुक्त विशेष निमंत्रित सदस्यपदावर पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर,कुर्डुवाडी शिवसेना शहर प्रमुख समाधान दास,अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुख, माळशिरस तालुका प्रमुख सतीश सप्ताळ,समाजसेवक सामी अहमद सकील अहमद मौलवी यांची नव्याने विशेष निमंत्रित सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

       वरील नियुक्ती ही शिवसेना सचिव संजय मशीलकर यांच्या विशेष प्रयत्नातून झाली आहे. यानंतर मार्गदर्शक व शिवसेना संपर्क प्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे ,मनिष काळजे , पंढरपूर तालुका युवा सेना तालुकाप्रमुख महादेव भोसले, शिवसेना पंढरपूर उपतालुका प्रमुख गणपत कोलगे, यांचे सह पंढरपूर तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक या सर्वांनी अभिनंदन केले