मंदिर समितीस नागपूर येथील भाविकाकडून 1 लक्ष रूपयाची देणगी

मंदिर समितीस नागपूर येथील भाविकाकडून 1 लक्ष रूपयाची देणगी

पंढरपूर ( प्रतिनिधी ) – स्व. सुधा मोतीराम मावदेकर यांचे स्मरणार्थ शरयू सर्वनन आय्यर यांच्या तर्फे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस 1 लक्ष रूपयाची देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा विभाग प्रमुख श्री.पांडूरंग बुरांडे यांच्या शुभहस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला. त्यावेळी कर्मचारी श्री योगेश कागदे व श्री वैभव तुरेवाले उपस्थित होते. श्री आय्यर हे पार्वती नगर, नागपूर येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आज धनादेशाद्वारे मंदिर समितीस देणगी दिली आहे.

सद्यस्थितीत, चैत्री यात्रेचा कालावधी सुरू असून, भाविकांची गर्दी वाढत आहे. देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाईन देणगीसाठी QR CODE, RTGS ची सुविधा उपलब्ध असून, देणगीसाठी इच्छुक भाविकांनी श्री संत तुकाराम भवन येथील कार्यालयास संपर्क साधावा असे विभाग प्रमुख श्री पांडूरंग बुरांडे यांनी सांगीतले.