सिद्धेवाडीचे सुपुत्र डॉ.विठ्ठल जाधव यांचा राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्काराने गौरव

सिद्धेवाडी येथील डॉ.विठ्ठल शिवाजी जाधव यांचा स्व. हरीश्चंद्र फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या "राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सोलापूर येथील फडकुले सभागृहात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा विचार करून या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.घरची गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. कॉलेजचे शिक्षण घेत असताना पंढरपूर येथील मुकुल भोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये ते कित्तेक दिवस डॉ. भोसले यांच्यासाठी सेवक म्हणून काम करत होते. शिक्षण घेत-घेत फारच जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय आष्टा येथे प्रवेश मिळवला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण आण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आष्टा येथे झाले. अगदी लहानपणापासून गावातील बरीच शिक्षक मंडळी याचे साक्षीदार आहेत.डॉक्टर झाल्यापासून ते आजही परिसरातील अंध-अपंग व मूकबधिर व्यक्ती, शालेय गरीब विद्यार्थी, माजी सैनिक आणि ज्यांना मुलगा नाही असे वृद्ध यांना मोफत सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत.व्यायाम आणि खेळ त्यांच्या खूप आवडीचे क्षेत्र. साधारण 1998 ते 2007 या काळातील आपल्या गावातील आमच्या नवजीवन क्रिकेट संघात एक उत्कृष्ट बॉलर म्हणून ते ओळखले जायचे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी अगदी मनापासून चांगली सेवा बजावली आहे, बजावत आहेत.त्यांचा राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला