श्री पांडुरंग पालखी सोहळाचे श्रींच्या पादुकांचे मंदिरातून श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान

श्री.पांडुरंग पालखी सोहळा 2023

कार्तिकी वद्य त्रयोदशीला संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळयासाठी श्री.पांडूरंगाच्या पादुका पालखीतुन आळंदी येथे घेवून जाण्याचा व परत आणण्याचा उपक्रम श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्यावतीने सन 2014 पासून सुरु करण्यात आलेला आहे. सदरचा पालखी सोहळा कार्तिक शुध्द 15 सोमवार (दि.27/11/2023) ते मार्गशीर्ष शुध्द 10 शुक्रवार (दि.21/12/2023) या कालावधीत आळंदी येथे जाऊन परत येणार आहे. सदर पालखी सोहळयासमवेत आळंदीला जाताना व येताना मोठया प्रमाणात वारकरी/भाविक असणार आहेत.

         श्री पांडुरंग पालखी सोहळाचे आजरोजी श्रींच्या पादुकांचे मंदिरातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळयासाठी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले. यावेळी मंदिर समितीचे मा. सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर महाराज, ह.भ.प प्रकाश महाराज जंवजाळ, श्री संभाजी शिंदे तसेच सल्लागार परिषद सदस्य ह.भ.प विठ्ठल महाराज वासकर व श्री बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, संजय कोकीळ, नित्योपचार विभाग प्रमुख व इतर विभाग प्रमुख तसेच सहा.नित्योपचार विभाग प्रमुख व मंदिर कर्मचारी वृंद उपस्थित होते