आ. समाधान अवताडे यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पंढरपूर( विठ्ठल टाईम्स )प्रतिनिधी:-
नगरसेवक लखन चौगुले, धनुभाऊ धोत्रे, रामा चौगुले, श्रीकांत चौगुले ,दीपक चौगुले ,यांचा आमदार समाधान दादा आवताडे साहेब व भारतीय जनता पार्टीमध्ये आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज चे चेअरमन व नामवंत उद्योजक श्री संजय जी मालक आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश झाला.
सध्या भाजपमध्ये इन्कमिंग जोरात चालू असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट व काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. त्याचा फायदा आ.समाधान अवताडे यांना होत असून भाजपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इनकमिंग होत आहे.याचा तोटा भालके गट व सावंत गट यांना बसत असून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघामध्ये भाजप उमेदवाराची ताकद वाढलेली दिसून येत आहे.