अनिल सावंत यांची प्रचारात आघाडी पंढरपूर शहरात काढलेल्या पदयात्रेस उत्तुंग प्रतिसाद

अनिल सावंत यांची प्रचारात आघाडी पंढरपूर शहरात काढलेल्या पदयात्रेस उत्तुंग प्रतिसाद

विठ्ठल टाईम्स प्रतिनिधी :-

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार या पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि सावंत यांची आज पंढरपूर मध्ये पदयात्रा काढण्यात काढण्यात आली .

सकाळी , आठ ते दुपारी एक या वेळेमध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेमध्ये कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारार्थ आयोजित केलेल्या संपर्क दौराने पदयात्रेला सरगम चौकापासून सुरुवात करण्यात आली. सरगम चौकापासून सुरू झालेली पद यात्रा पुन्हा सरगम चौकामध्ये येऊन थांबली. यामध्ये कुंभार गल्ली ,शिंदे नगर, कैकाडी महाराज मठ , झेंडे गल्ली ,कडबे गल्ली ,तेली गल्ली, भोसले चौक आणि पुन्हा सरगम चौक असा यात्रेचा रूट ठेवण्यात आला होता .

या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर अभंगराव, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, माजी तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना शरद जोशी पक्षाचे शिवाजी नागटिळक महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. पवार साहेबांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अनिल सावंत यांचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे .अनिल सावंत यांनी प्रचारातला जोर लावला असून नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे .या पदयात्रेत हजारो संख्येने नागरिक महिला विद्यार्थी सहभागी झाले होते.

 सरगम चौकापासून सुरू झालेली यात्रा कुंभार गल्ली, शिंदे नगर, कैकाडी महाराज मठ , झाडे गल्ली, झेंडे गल्ली, कडबे गल्ली, 

 कर्नल भोसले चौक आणि पुन्हा सरगम चौक असा प्रवास करून संपन्न झाली.

 या पदयात्रेमध्ये महाविकास आघाडीचे अधिकार उमेदवार अनिल सावंत यांनी विविध नागरिकाची चर्चा केली विविध क्षेत्रांमध्ये छोटे व्यापारी, ऑटोमोबाईल गॅरेज पेंटिंग, वर्कर्स फील, अलाइनमेंट व इतर दुकाने पान टपरी, छोटे हॉटेल व्यवसाय, अशा अनेक व्यवसायिकाशी अनिल सावंत यांनी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

महागाई जीएसटी यामुळे पूर्वीसारखा व्यवसाय राहिला नसल्याची प्रतिक्रिया या व्यापारी वर्गाने दिल्या. विविध गल्लीमधून पदयात्रा जात असताना स्थानिक नागरिकांनी पायाभूत सुविधांची सोय नसल्याचा आरोप केला अनेक गल्लीमध्ये गटारी, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची सोय नसल्याने नागरिकांनी सांगितले .

समाधान आवताडे जिंकून आल्यानंतर एकदाही इकडे फिरकले नसल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिल्या यावेळी विधानसभेमध्ये मला संधी द्या पायाभूत सुविधा स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, गटारी ,स्वच्छता या सगळ्या समस्या निश्चितपणे कायमच्या सोडवल्या जातील अशी आश्वासने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि सावंत यांनी स्थानिक नागरिकांना दिली