राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी साधला 14 गावाचा गाव भेटी दौऱ्यात जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या तक्रारी.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी साधला 14 गावाचा  गाव भेटी दौऱ्यात  जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या तक्रारी.

सध्या निवडणुकीचे वारे अखंड महाराष्ट्रभर घुमत आहे अशातच प्रत्येक उमेदवाराची प्रचाराची घोडदौड प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे. 

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनीही संपर्क दौरा व पदयात्रा यानिमित्ताने आज दिनांक 11/11/2024 रोजी 14 गावांना भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला. 

ग्रामस्थांनी सांगितलेल्या अडीअडचणींवर येत्या काळामध्ये नक्कीच काम करून त्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन यादरम्यान अनिल सावंत यांनी दिले. 

महिलांनी औक्षण करून तर तरुणांनी जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. या प्रचारादरम्यान महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आणि पाठींबा पहावयास मिळाला.

 पाणी, रस्ते आणि आरोग्य याचसोबत रोजगार या महत्त्वाच्या विषयांवरती आपण काम करू असे आश्वासन अनिल सावंत यांनी या प्रचारादरम्यान ग्रामस्थांना दिले. येत्या काळामध्ये शैक्षणिक संकुल उभारून येथील मुलांची पुणे मुंबईची शैक्षणिक वारी कशी कमी करता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याचे आश्वासन देखील अनिल सावंत यांनी केले. 

'राम कृष्ण हरी वाजवा तुतारी' अशा प्रकारच्या घोषणा देत ग्रामस्थांनी अनिल सावंत यांना आपला पाठिंबा दर्शवला. 

भविष्याच्या धोरणाकडे पाहताना या भागाचे परिवर्तन होईल असा विश्वास मनाशी बाळगत अनेक राजकीय व्यक्तींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यामध्ये आपला पक्ष प्रवेश केला. 

'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हा पुढील बटन दाबून असंच प्रेम येत्या काळामध्ये दाखवावं अशी विनंती यादरम्यान अनिल सावंत यांनी केली