प्रणिती शिंदेंसाठी कर्नाटक मंत्री एम बी पाटील यांनी बांधली लिंगायत समाजाची मोट
एम बी पाटील म्हणाले, मोदींनी स्वप्न दाखवलेले आच्छे दिन कुठे आहेत, महागाई वाढली, गॅस टाकी महागली, पेट्रोल डिझेल महागले हे तर बरेच दिन म्हणायचे ना. मनमोहनसिंग हे पंतप्रधान असताना आर्थिक स्थैर्य होते, राजीव गांधी असताना अनेक धोरण राबवले, हा मोदी देशावर कर्जाचा डोंगर ठेवून देश लुटत आहे, जाती पातीचे राजकारण सुरु केले आहे, धर्माच्या नावाखाली भावनिक करतो, आता जनता त्यांना कंटाळली असून यंदा सोलापुरात परिवर्तन झाले पाहिले त्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनाच विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ ते स्वतः सोलापुरात येऊन लिंगायत समाजाची बैठक घेतली, त्यांचे कायम सहकार्य असते, समाजाला मतदान करण्याचे आवाहन केल्याबद्दल सुशीलकुमार शिंदे व सिद्धाराम म्हेत्रे यांनी मंत्री एम बी पाटील यांचे आभार व्यक्त केले.
प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाळासाहेब शेळके यांनी बैठकी मागील उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे व काशिनाथ भतगुनकी यांनी केले