पंढरपूर येथे संपन्न झाला शेतकरी मेळावा .
विठ्ठल टाईम्स प्रतिनिधी:-
तासगाव चमन व्हॉटस् अप समूहाने नुकताच पंढरपूर येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळावा प्रचंड यशस्वी झाला. या मेळाव्यामध्ये 800 हून अधिक द्राक्ष उत्पादकांनी एकत्र येऊन ज्ञानाची देवाणघेवाण केली आणि आपल्या द्राक्ष उद्योगात नावीन्य आणण्या साठी प्रयत्न केले.
डॉ. एस.डी. सावंत, डॉ. इंदू सावंत, डॉ. प्रकाश माळी, मा. विशाल पाटील, मा. मंगेश भास्कर, मा. अरविन्द खोंडे, श्री झांबरे मामा, श्री वसंतराव माळी आणि इतर अनेक द्राक्ष शास्त्रज्ञ आणि प्रगतीशील द्राक्ष बागायतदारांनी संपूर्ण कार्यक्रमात अमूल्य माहिती आणि मार्गदर्शन केले.

या मेळाव्यात, द्राक्ष शेती करताना जमिनीकडे लक्ष देवून जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंचे भरीव योगदान अधोरेखित करण्यात आले. डॉ. प्रकाश माळी यांनी लिबिग लॉ ऑफ मिनिमम सांगितला. ज्यामध्ये उत्पादन प्रक्रियेत सर्वात कमी पडणाऱ्या घटकामुळे होणारी पीकांची मर्यादित वाढ यावर जोर दिला आहे.
अशा चर्चेत सहभागी झालेल्या आणि योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे तासगाव चमन समूहाचे व्यवस्थापक मा. रमेश माइनकर सरांनी आभार मानले. हा शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी श्री प्रवीण कोंडूभैरी, समाधान कांबळे, शंकर गवळी, प्रवीण कोरे, नानासो साखरे, अभिजीत हराळे आणि इतर अडमिन यांनी मुख्य भूमिका पार पाडली.