सिद्धेवाडीचे डॉ. विठ्ठल जाधव यांना राष्ट्रीय स्नेहबंधचा पुरस्कार जाहीर,रविवार दि. २४ रोजी सोलापूरात जंगी कार्यक्रम

सिद्धेवाडीचे डॉ. विठ्ठल जाधव यांना राष्ट्रीय स्नेहबंधचा पुरस्कार जाहीर,रविवार दि. २४ रोजी सोलापूरात जंगी कार्यक्रम

विठ्ठल टाईम्स प्रतिनिधी:-

सिद्धेवाडीचे डॉ. विठ्ठल जाधव यांना राष्ट्रीय स्नेहबंधचा पुरस्कार जाहीर,रविवार दि. २४ रोजी सोलापूरात जंगी कार्यक्रम

----------------------------------------------------------------------------------

सोलापूर,पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील नामांकित डॉ. विठ्ठल शिवाजी जाधव यांना स्व .हरिश्चंद्र फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती स्व .हरिश्चंद्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णात गायकवाड यांनी संस्थेच्या प्रसिद्धी पत्रिकाद्वारे दिली आहे.

सालाबाद प्रमाणे स्व .हरिश्चंद्र फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा नामांकित पुरस्कार प्रत्येक वर्षी देण्यात येतो. यंदा राज्यभरातील सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ६० मान्यवरांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती स्व. हरिश्चंद्र फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णात गायकवाड यांनी दिली. डॉ. विठ्ठल जाधव यांना राष्ट्रीय स्नेहबंध हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील डॉक्टर असोशियन, सामाजिक, राजकीय , कला- क्रीडा ,सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि डॉ.विठ्ठल जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना स्वागतपर शुभेच्छा दिल्या तसेच रहिवासी असलेल्या सिद्धेवाडी येथील निवासस्थानी भेटून मित्रपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

*****************************************************

राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ .विठ्ठल जाधव यांनी यावेळी बोलताना म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केल्यापासून गोरगरीब सामान्य वर्गातील नागरिकांची उदार अंतकरणाने सेवा केल्यामुळेच मला स्व .हरिचंद्र फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल फाउंडेशनचे मी प्रथमता आभार मानतो आणि इथून पुढे अशाच पद्धतीने वैद्यकीय क्षेत्रात काम करताना लहान थोर नागरिकांची कायमस्वरूपी सेवा करण्याची मला संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो असे यावेळी बोलताना सांगितले.