सहकारातुन आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील - आमदार अभिजीत धनंजय पाटील

सहकारातुन आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील - आमदार अभिजीत धनंजय पाटील
सहकारातुन आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील - आमदार अभिजीत धनंजय पाटील
सहकारातुन आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील - आमदार अभिजीत धनंजय पाटील
सहकारातुन आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील - आमदार अभिजीत धनंजय पाटील

वेणुनगर, दि.३०. : श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याची अधिमंडळाची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २६.०९.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत धनंजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीस श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन, कारखान्याचे संस्थापक-चेअरमन कर्मवीर कै. औदुंबरआण्णा पाटील, संस्थापक-व्हाईस चेअरमन यशवंतभाऊ पाटील, दिवंगत सर्व माजी चेअरमन यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित जेष्ठ सभासदांचे शुभहस्ते करण्यात आले.

तसेच श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा सन २०२६-२७ गळीत हंगामाचा ४५ वा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभशनिवार दिनांक २६.०९.२०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता जगदगुरु संत श्री तुकोबाराय यांचे वंशज ह.भ.प.प्रा. श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहूकर यांचे शुभहस्ते व होम पुजन श्री अमोल अभिमान शेळके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुरेखा, कारखान्याचे संचालक श्री जनक माणिक भोसले त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्नेहल, कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीतआबा पाटील, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.

तसेच सन २०२६-२७ चा ४५ वा गळीत हंगामाचा शुभारंभ श्री विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन श्री दिनकर दत्तात्रय पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अरुणा यांचे शुभहस्ते कलश पुजन होवून उपस्थित कारखान्याचे जेष्ठ सभासद यांचे शुभहस्ते, कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीतआबा पाटील, व्हा. चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, मार्गदर्शक स्वेरी शैक्षणिक संकुलाचे सचिव प्रा.बी.पी.रोंगे सर, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड तसेच शेतकरी, सभासद, तोडणी वाहतुक ठेकेदार, अधिकारी व कामगार यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.

याप्रसंगी जगदगुरु संत श्री तुकोबाराय यांचे वंशज ह.भ.प.प्रा.श्रीगुरु बाळासाहेब महाराज देहकर हे यांनी आर्शिवाद रुपी शुभेच्छा देताना म्हणाले की, १२५०० मे. टन गाळप क्षमता असलेले महाराष्ट्रात हाताच्या बोटा एवढेच कारखाने आहेत, त्यामध्ये श्री विठ्ठल कारखाना आहे. हि गौरवाची बाब आहे, या कारखान्यात साखरे बरोबरच इतर उपपदार्थांची निर्मिती केली जाते, त्यामुळे हा कारखाना चेअरमन आमदार अभिजीत आबा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली निश्चित प्रगतीपथावर राहील, अशी भावना व्यक्त केली आणि येणारा गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी शुभेच्छा दिल्या.

वार्षिक सभेचे आरंभी कारखान्याचे कार्यलक्षी संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत केले. कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक, श्री डी. आर. गायकवाड यांनी विषय पत्रीकेवरील विषयांचे वाचन केले. या सर्व विषयांना सभासदांनी आवाजी मतांनी व हात उंचावून मंजूरी दिली.

अधिमंडळाच्या ५१ वी वार्षिक सर्वसाधारण समेमध्ये चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांनी सन २०२५-२०२६ हंगामाचा अहवाल सादर केला,

मागील हंगामाचा लेखाजोखा मांडत असताना सन २०२२ पासून कारखान्याची असलेली आर्थिक परिस्थिती व वाढलेली गाळप क्षमता, कारखान्याने दिलेला ऊसाचा दर, यंत्रसामुग्रीमध्ये केलेली आधुनिक सुधारणा, कारखान्याच्या शैक्षणिक संकुलामध्ये केलेल्या सुधारणा, वृक्ष लागवड तसेच परिसर विकास यासह दिर्घकालीन अडकुन राहिलेले कर्मचाऱ्यांचे पगार, हुद्दा व कायम वर्गवारीचे विषय अशा विस्तृत विषयांवर भाष्य करत असताना १२५० टीसीडी क्षमता असणारा कारखाना येणाऱ्या हंगामात १२५०० टीसीडी क्षमतेने चालणार आहे. कारण मागील दोन वर्षात ८० कोटी रुपयेची गुंतवणूक करुन कारखान्यात आधुनिकीकरण दुरुस्तीकरण केलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपला कारखाना १२५०० मे. टन प्रतिदिन क्षमतेने चालणार आहे. मागील चार वर्षामध्ये कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा जादा दर दिल्यामुळेही तोटा सहन करावा लागला आहे हे त्यांनी नमुद केले. तसेच सन २०२५-२६ मधील आसवणी, सहवीज निर्मिती प्रकल्पाचे माध्यमातुन झालेले उत्पादन व विक्रीचा अहवाल सभासदांसमारे मांडण्यात आला.

यावेळी सभासदांच्या लेखी प्रश्नांची उत्तरे देताना मागील व चालू आर्थिक स्थिती व अडचणीचे विस्तृत विवेचन करुन सभासदांच्या सर्व प्रश्नांची व शंकेचे निरसन केले,

मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांव्दारे आपला कारखाना व कारखान्याचे संचालक मंडळाची बदनामी करण्याचा प्रयत्न काही कारखाना विरोधी भूमीका असणाऱ्या लोकांकडून केला जात आहे. अशा प्रवृतीच्या लोकांना कारखाना सभासद त्यांची योग्य जागा दाखवतील याची मला खात्री आहे. आज कारखान्याचे सभासदां समोर सर्व लेखाजोखा मांडून कारखान्यावर असलेले कर्ज फेडणेसाठी उत्पन्न बाढविणे गरजेचे आहे, कारखान्याचे आर्थिक नियोजन व विकास यामध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही, असे यावेळी त्यांनी सांगितले.

आपले कारखान्याचे आसवनी प्रकल्पामध्ये सुधारणा करुन १०० के.एल.पी.डी. क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पाचे काम सुरु केलेले होते, परंतु शासनाकडून इथेनॉल धोरण बंद केल्याने अडचण निर्माण झाली आहे. केंद्र शासनाचे धोरणामध्ये साखरेची किंमत कमी व ऊसाची किंमत जास्त अशी तफावत असले कारणाने महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. याकरिता साखरेचे किमान विक्री मुल्य (एम.एस.पी.) ४७०० ते ४८०० असणे गरजेचे असल्याचे सांगीतले.

कारखाना कार्यस्थळावर बायोसीएनजी ३ टन प्रकल्पाची बांधा वापरा व हस्तातर करा या तत्वावर उभारणी करुन प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. पुढील वर्षी कारखाना मालकीचा ४ टन क्षमतेचा प्रकल्प उभा करणेचा मानस त्यांनी व्यक्त केला.

आपले कारखान्यामार्फत श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयाची शासनाची मंजुरी मिळालेली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ पासून प्रत्यक्ष सुरु झालेले आहे. यासाठी विशेष करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, कृषि मंत्री मा.श्री दत्तात्रय भरणे साहेब यांचे यासाठी सहकार्य लाभले. कारखान्याचे शैक्षणिक संकुलामध्ये सिनियर महाविद्यालय, इंग्लिश मेडियम स्कूल, आयटीआय, डी फार्मसी व बी फार्मसी तसेच बी.एड व एम.एड कॉलेज सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांचे कोट्यातुन कुस्ती संकुलासाठी २ कोटी निधी प्राप्त होणार असून त्यांचेही आभार व्यक्त केले. इंडोअर स्टेडिमसाठी प्रस्ताव दाखल करणेत आलेला आहे त्याकरीता रु.१.२५ कोटी निधी मंजूर झालेला असून सदर स्टेडियम मध्ये वेगवेगळे २८ खेळ खेळता येणार आहेत.

तसेच हंगाम २०२४-२५ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाला रु.३५००/- दर देणेचे जाहिर करण्यांत आलेला होता. त्यापैकी आजवर प्र.मे.टन रु.३००३/- अदा केलेले असून उर्वरीत रकमेपैकी माहे जानेवारीमध्ये जाहीर केलेनुसार रु.१००/-दिपावली सणासाठी अदा करणार असल्याचे सभासदांना सांगितले असून, उर्वरीत रक्कम टप्याटप्याने अदा केले जातील असे सांगितले.

तसेच कामगारांसाठी राज्यस्तरीय त्रिपक्षीय समितीच्या झालेल्या निर्णयानुसार माहे सप्टेंबर २०२६ पासून १० टक्के पगार वाढ लागू करणेत येणार आहे. याशिवाय दिपावली सणानिमित्त कामगारांना एक महिन्याचा पगार (८.३३ टक्के) बोनस देणार असल्याचे जाहिर केले. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत देय रकमेबाबत झालेल्या करारानुसार रक्कम अदा करणेस सुरु असून लवकरच ठरल्याप्रमाणे रक्कम अदा केली जाईल. सध्या कामावर असणारे कर्मचारी यांचे मागील ३१ महिन्याचे कारखाना बंद कालावधीतील कारखाना व कामगार यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार थकीत पगार व इतर देणी अदा करणेच्या अनुषंगाने मा. साखर आयुक्त यांनी कारखान्यातील भंगार विक्री करण्यास मंजुरी दिली असून लवकरच ठरल्याप्रमाणे त्यांची ही देणी अदा केली जातील.

उपस्थितीत सभासदांनी आजवर कारखान्यास व संचालक मंडळास दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करुन येणाऱ्या गळीत हंगामासाठी इतर कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता १०० टक्के ऊस आपल्याच कारखान्याला पाठवावा, असे आवाहन केले.

या सभेसाठी संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, समाधान काळे, श्रीमती कलावती खटके, सौ. सविता रणदिवे, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, तानाजी बागल, सचिन शिंदे-पाटील, समाधान गाजरे, धनाजी खरात, उमेश मोरे, गणेश ननवरे, एम.एस.सी. बँकेचे प्रतिनिधी सी.एस. पाटील, मोठ्या संख्येने कारखान्याचे माजी संचालक, सभासद, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सर्व उपस्थित सभासदांचे संचालक श्री दिनकर चव्हाण यांनी आभार मानले व सुत्रसंचलन प्रा.श्री नागटिळक केले.