काही चुकीच्या पाकीट मारू लोकांच्या चुगलीमुळे महाविकास आघाडीत गैरसमज. जनता माझ्याच पाठीशी -भगीरथ भालके

काही चुकीच्या पाकीट मारू लोकांच्या चुगलीमुळे महाविकास आघाडीत गैरसमज. जनता माझ्याच पाठीशी -भगीरथ भालके

विठ्ठल टाईम्स प्रतिनिधी :-

मी उमेदवार म्हणून आपल्यासमोर येत असताना माझ्या वडिलांनी 2014 2009 2019 या तीन वेळेला निवडणूक लढवीत असताना इथल्या मायबाप जनतेने भारत नानावर तिने वेळेला विश्वास टाकून आशीर्वाद देण्याची जबाबदारी पार पडली. या मतदारसंघांमध्ये काम करत असतात मायबाप जनताला केंद्रबिंदू मानून जनतेसमोर जाण्याचा आम्ही प्रयत्न केला असून दरम्यानच्या काळामध्ये नानांचे निधन झाले नंतर झाल्या पोट निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी झाल्या. त्यामध्ये माझा 37 00 मताने पराभव झाला. तो पराभव उमेदवारांना या नात्याने स्वीकारून त्यानंतरच्या काळामध्ये आणि अनेक अनेक अडचणीला तोड देऊन जनतेमध्ये मिसळून जनतेच्या समजून जनतेच्या सुखदुःखात जाऊन त्यांच्या काम करण्याची संधी मला मिळाली. नानांच्या केलेल्या कामाच्या आशीर्वादामुळे आज पर्यंत मी इथपर्यंत आलो आहे. लोकसभेच्या काळामध्ये काम करत असताना आम्हाला भारत नानांची शिकवण होती की कोणतेही काम करत असताना प्रत्येक गावातील वडीलधारी माणसना पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यावयाचा नाही. लोकसभेच्या वेळेला केंद्रातील सरकार बदलले पाहिजे हीच येथील जनतेचे हीच भावना होती केंद्रातील भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी, बेरोजगारी , भ्रष्टाचारी व जनतेच्या हिताचे कुठले निर्णय घेत नसल्यामुळे त्यांना बदलणे ही काळाची गरज होती. या भागातील जनतेने निवडून दिलेला खासदार कधी आमच्या हक्कासाठी न्यायासाठी संसदेत मत मांडताना दिसला नाही , संस्थेत जनतेच्या हिताचे कुठलेही प्रश्न विचारले नाहीत. असा खासदार जर बदलायचा असेल तर खासदार प्रणीती ताई शिंदे यांच्यासारख्या उमेदवाराला संसदेत पाठवणे गरजेचे होते. यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय निर्णय आम्ही घेऊन खासदार प्रणिता ताई शिंदे यांच्या पाठीशी उभे राहून पंढरपूर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातून भरघोस असे मताधिक्य दिले तसेच पंढरपूर तालुक्यातील माढा मतदारसंघातील 42 गावातून  मोहिते पाटील यांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका आम्ही घेतली. त्यावेळी ताईच्या विजया मध्ये सिंहाचा वाटा उचलला. आणि त्याचवेळी ठरवले की जनतेमध्ये असलेली जनभावना लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची व शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रातील हे सरकार घालवायचे ग्रामीण भागामध्ये एक मन आहे . ईडा पिडा टळू दे आणि बळीच राज्य येऊ दे. खऱ्या अर्थाने जर बळीराजाचे राज्य आणायचे असेल तर हे चुकीचे सरकार जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तोपर्यंत राज्यातील जनतेला शेतकऱ्याला कष्ट करायला न्याय मिळत नाही. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या सरकारला घालवणे गरजेचे आहे. आज मनू जरांगे पाटील न्यायासाठी झटत असून त्यांनाही झुलवत ठेवण्याचे काम करण्याचे पाप हे सरकार करीत आहे मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज ,कोळी समाज, लिंगायत समाज, आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहे. . सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत असून दूध व्यवसाय अडचणीत आला आहे अनुदानाच्या नावाखाली फक्त गाजर दाखवण्याचे काम करीत असल्याचे दिसून येते. माझी लढाई भाजप सरकार आणि चुकीच्या लोकांच्या विरोधात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि लोकांची ही तीच भावना आहे परंतु या तालुक्यातील काही चुकीच्या लोकांनी जी पाकीट गॅंग म्हणून प्रसिद्ध आहे यांनी वेगळ्या पद्धतीचे कान भरून मेसेज देऊन त्या ठिकाणी चुकीची माहिती देऊन आघाडीमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे परंतु कदापिही यामध्ये त्यांना यश येणार नाही कान भरण्याचे काम केले. महाविकास आघाडीने सुरुवातीला माझी उमेदवारी जाहीर करून मला एबी फॉर्म दिला होता. तसाच फॉर्म दिलीप माने यांनाही दिला होता परंतु तिथे मात्र काँग्रेसने आपली उमेदवार माघारी देऊन महाविकास आघाडीचा धर्म पाळला. येते मात्र तो पाळला गेला नाही ते पाळणे गरजेचे असताना मी आज येथील काही नाही तर मंडळींना विनंती करतो की माझ्यासाठी नाही परंतु येथील मायबाप जनतेसाठी आपण या गोष्टीचा विचार करावा कारण आपल्याला हे सरकार उधळून ढाकणे गरजेचे आहे 

विठ्ठल परिवार हा पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे झालेल्या मीटिंगमध्ये शहर व तालुक्यामध्ये सर्व परिवारातील घटकांनी मला एक मताने पाठिंबा दिला आहे आम्ही परिवारातील काही नेतेमंडळींना जर इतर पक्षात असलो तरी विठ्ठल परिवारातील व्यक्तीला सहकार्य करणे हे गरजेचे आहे. त्यामुळे त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही या 

या निवडणुकीमध्ये निश्चितपणे जनता माय बापाच्या जीवावर शंभर टक्के निवडून येणार याची मला खात्री आहे हे निवडणूकजनतेच्या हातात गेले असून जनतेनेच मनावर घेतले आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तसेच दादा भालके आणि सिद्धेवाडी येथील प्रचार सभेमध्ये बोलताना व्यक्त केले यावेळी सिद्धेवाडी परिसरातील मतदार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.