आपला विजय निश्चित आहे फक्त सफरचंद हे चिन्ह नवीन असल्यामुळे ते मतदारापर्यंत रुजवा -आमदार बबनदादा शिंदे.
विठ्ठल टाईम्स प्रतिनिधी :-
गेली सहा वेळा तर आपल्या मधून तीन वेळा आपल्या मतदाराच्या जीवावर भरघोस मताने निवडून आलो आहे. आज मी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपणाकडे मत मागत आहे. मी केलेली कामे आपल्यासमोर आहेत माझ्या पाठीशी या 42 गावातील विठ्ठल परिवार पांडुरंग परिवार व शिंदे परिवार हा ठामपणे उभा आहे मी कधीही कुणाची अडवणूक केली नाही मग कोणतेही काम असो प्रत्येक गावामध्ये विकास करूनच मी मत मागत आहे.
विकास कामाचा प्रचार करीत आहे. तरी तरीपण आज माझ्यावर खोटे नाटे आरोप काही व्यक्तीकडून होत असून ते बिन बुडाच्या आरोप जनतेला माहित आहेत. मी विकास कामे करत असताना मग समाज मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय असो पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो जनतेच्या हिताचे सर्व प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि यापुढे माझा मुलगा आपल्या हिताचे सर्व प्रश्न सोडवेल याची मला खात्री आहे.
प्रत्येक वेळी या बेचाळीस गावातून मला लीड मिळाले आहे. पुढील उमेदवार हा काही खोटे आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. या भुलथापांना मतदार भुलणार नाही याची मला खात्री आहे .
आज विजय शुगर वर आमचे 23 कोटी येणे आहे असा आरोप केला जात आहे . वस्तुस्थिती मात्र वेगळ्या असून विजय शुगर हा आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून नीलावात घेतला आहे. त्याच वेळी सर्व काही देणे आम्ही क्लिअर केले आहे.आज आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे देणे बाकी नाही अडचणच्या काळामध्ये विजय शुगर घेऊन आम्ही या भागातील ऊस उचलून शेतकऱ्यांना मदत केली आहे.
आज मी आजारी असल्यामुळे रणजीत सिंह भैया याला आपला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहे.
रंजीत भयाने देखील आजपर्यंत विविध पदावर काम केले आहे. त्याला कामाचा दंडगा अनुभव आहे. माझ्या तीन वर्षाच्या आजारपणामध्ये तो प्रत्येक गावामध्ये हिंडून फिरून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही त्याला एक वेळ निवडून द्या जर त्याने ह्या संधीच सोन नाही केलं तर पुढचा निर्णय तुम्ही घेऊ शकता परंतु कोणाच्यातरी भूलथापाला बळी पडून नका आपण आपले मतदान योग्य उमेदवारला करणे हे गरजेचे आहे. आज काही संस्था खूप प्रचंड कर्जामध्ये असताना देखील फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे केलं ते केलं असे सांगत आहेत. हे जास्त काळ दिवस टिकणारे नाही हे आपणाला माहित आहे सर्व जाती धर्माला समाविष्ट करून मी राजकारण केले आहे .
आज माझ्या मुलाचा विजय हा निश्चित असून तुम्ही मतदारांनी मला प्रत्येक वेळी निवडून दिले आहे. परंतु आपले चिन्ह यावेळी वेगळे आहे हे चिन्ह तुम्ही जनतेत रुजून मतदाराला समजावून सांगणे गरजेचे आहे सफरचंद चिन्ह पुढील बटन दाबून येत्या 20 तारखेला रणजीत भैयाला निवडून देऊन काम करण्याची संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर आलो आहे. असे आव्हान आमदार बबनदादा शिंदे यांनी जाहीर सभेत केले.
यावेळी प्रचारादरम्यान प्रत्येक गावामध्ये त्यांचे ढोल ताशे वाजून स्वागत होत असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद असलेले यावरून दिसून येत आहे.